घरंदाज स्वरशुभदा
पंडिता शुभदा पराडकर यांची घरंदाज गायकी ऐकली की, मला साजूक तुपातला शिरा आठवतो. आज एकसष्टीमध्ये पदार्पण करताना शुभदाताई सर्वच आघाड्यांवर अत्यंत समाधानी, यशस्वी आणि आनंदी आहेत व कलासक्त जीवन जगत आहेत, असं म्हणावं लागेल. आमच्यासारख्या प्रत्येक कलाकाराने त्यांच्या जीवनापासून प्रेरणा घ्यावीव आपले जीवन समृद्ध करावे असे वाटते. जीवेत् शरदः शतम्!!.......